जालना - जालना शहरातील साहित्यप्रेमींसाठी एक आगळावेगळा साहित्यिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कै. डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना संचलित डॉ. सुभाषराव ढाकणे महाविद्यालय, माऊली प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय आणि अक्षरवैभव साहित्य परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले अक्षरवैभव साहित्य संमेलन सोमवारी (दि. 28 सप्टेंबर) आयोजित करण्यात आले आहे. ‘काव्य-गझलांची’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
जालना येथील डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुलातील सरस्वती सभागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक पी. विठ्ठल (नांदेड) यांची उपस्थिती लाभणार असून, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध गझलकार शेख इक्बाल मिर्झा (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रीती प्रल्हाद वारे या स्वागताध्यक्ष आहेत.
सकाळी 10 ते 11.30 या वेळेत उद्घाटन समारंभ होईल. प्रसिद्ध साहित्यिक पी. विठ्ठल, नांदेड हे संमेलनाध्यक्ष असून प्रसिद्ध गझलकार शेखर इक्बाल मिर्झा, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी शीलाताई खेडकर, सचिव, कै. डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना आणि ॲड. गजानन मांटे, सहसचिव, कै. डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात मा. प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे यांच्यासह राम गायकवाड, संजीवनी तडगावकर, संजय खैरे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने आणि कैलास भाले यांचा ‘अक्षरवैभव सन्मान’ करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋषिधर अंभोरे व वैशाली फोके करणार असून आभार प्रा. बाबुराव नागरगोजे मानणार आहेत.
कवीसंमेलनात काव्याची बरसात
सकाळी 11.30 ते 1 या वेळेत कवीसंमेलन होणार आहे. केशव खटिंग, परभणी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवीसंमेलनात आशा डांगे, छत्रपती संभाजीनगर; ललित अधाने, छत्रपती संभाजीनगर; महेश मोरे, नांदेड; धम्मपाल जाधव, छत्रपती संभाजीनगर; लक्ष्मण खेडकर, पैठण; सुनील उबाळे, छत्रपती संभाजीनगर; नारायण खरात, अंबड; के. बी. शेख, पैठण; कन्हुलाल विठोरे, घनसावंगी; धनंजय गहाळे, सिल्लोड आणि अशोक खेडकर, जालना हे सहभागी होणार आहेत.
कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शशिकांत पाटील करणार असून आभार प्रा. कृष्णा कदम मानणार आहेत.
गझल मुशायऱ्याने रंगणार दुपार
दुपारी 1.30 ते 3 या वेळेत गझल मुशायरा होणार आहे. योगीराज माने, लातूर अध्यक्षस्थानी राहतील. यात सुधीर मुळीक, पुणे; डॉ. शुभांगी कुलकर्णी, परतूर; अविनाश कांडे, गंगाखेड; राजू आठवले, सिल्लोड; राणा दांडे, भोकरदन; आत्माराम जाधव, गंगाखेड; यशवंत हुरस्के, परभणी आणि आत्मा गोंदे, पालम सहभागी होणार आहेत.
गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन डॉ. राज रणधीर, जालना करणार असून आभार श्री. कुणाल जाधव, जालना मानणार आहेत.
‘समाज माध्यमांवरील साहित्य लेखन’ वर परिसंवाद
दुपारी 3 ते 3.30 या वेळेत समाज माध्यमांवरील साहित्य लेखन! या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. डॉ. शिवाजी हुरे, कळंब अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. डॉ. अनिरुद्ध मोरे, प्रा. विद्या कुलकर्णी, नाशिक आणि प्रा. डॉ. मारोती धुळे, घनसावंगी हे सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. पंडित रानमाळ, जालना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. उमेश मुंडे करणार असून आभार प्रा. अतुल थोरात मानणार आहेत.
समारोप सत्रात मान्यवरांची उपस्थिती
दुपारी 3.30 ते 4 या वेळेत संमेलनाचा समारोप समारंभ होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. संदीप ढाकणे, तहसीलदार, मालेगाव, जि. नाशिक राहणार आहेत. ममता सपकाळ, सुप्रसिद्ध साहित्यिक, पुणे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर . शैलेश राजमाने, नायब तहसीलदार, जालना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. ऋषिधर अंभोरे करणार असून आभार प्रा. प्रतीक्षा साहुजी मानणार आहेत.
या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे प्रा. डॉ. शशिकांत पाटील, अध्यक्ष, अक्षरवैभव साहित्य परिषद, जालना, डॉ. राज रणधीर, सचिव, अक्षरवैभव साहित्य परिषद, जालना तसेच डॉ. शरद कण्णागकर, प्रशासकीय अधिकारी, कै. डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुल, जालना यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. तसेच प्राचार्य विठ्ठल शामराव मेंढे, प्राचार्य, डॉ. सुभाषराव ढाकणे विधी महाविद्यालय, जालना आणि प्राचार्य डॉ. ऋषिधर अंभोरे, प्राचार्य, माऊली प्रशासकीय सेवा महाविद्यालय, जालना यांचाही समावेश आहे. कविता, गझल, साहित्य चर्चा आणि समाजमाध्यमांवरील लेखन अशा विविध अंगांनी समृद्ध असलेल्या या पहिल्या अक्षरवैभव साहित्य संमेलनामुळे जालना शहरात साहित्यिक विचारांची आणि अभिव्यक्तीची नवी मैफल रंगणार आहे. साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.