अंगारकी चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले राजुरेश्वराचे दर्शन

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार, माजी मंत्री दानवे यांच्या हस्ते महाआरती

Jalna Nayak    29-Sep-2026
Total Views |

अंगारकी चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले राजुरेश्वराचे दर्शन
 
श्रीक्षेत्र राजूरः मराठवाड्याचे आरध्य दैवत भोकरदन तालुक्यातील राजूर येथील राजुरेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी झालेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.मंगळवारी दुपारनपर्यंत सुमारे चार लाखांपेक्षा अधिक भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणपतीचे जी स्थाने असून त्यापैकी हे गणपतीचे पूर्णपीठ असल्याची अख्यायिका आहे. सोमवारी सायंकाळपासूनच राजूरकडे भाविकांची पावली वळत होती. मंगळवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्र व मराठवाड्यातून आलेल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. अंगारकी चतुर्थीनिमित्त संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. अनेक सेवाभावी संस्था तसेच भाविकांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. राजूर येथील महागणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त रात्री ठीक बारा वाजता वाजता श्री गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.यावेळी जालना जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, मालेगावचे तहसीलदार संदीप ढाकणे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.