वालसावंगीमध्ये पशुधन चोरीचा कहर

गरीब पशुपालकाच्या अवघ्या आठ दिवसांत ९ बकऱ्या चोरीला.

Jalna Nayak    29-Sep-2026
Total Views |
 
वालसावंगीमध्ये पशुधन चोरीचा कहर
 
​वालसावंगी: कोरड्या दुष्काळाची भीषण दाहकता आणि त्यातच वाढत्या चोरीच्या सत्रामुळे वालसावंगी परिसरातील गरीब पशुपालक मजूर वर्ग पुरता हवालदिल झाला आहे. जोडधंदा म्हणून पोटच्या पोरासारख्या जपलेल्या मजुरांच्या बकऱ्या चोरट्यांनी टार्गेट केल्या असून, गेल्या अवघ्या आठच दिवसांत तब्बल ९ बकऱ्या चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
​या वाढत्या चोरीच्या सत्रामध्ये मंगळवारी(ता.29) पुन्हा चोरांनी गजानन गायकवाड यांच्या ३ बकऱ्यांवर डल्ला मारला. याआधीच्या घटनांमध्ये साहेबराव खरात (२), नजीम पठाण (२) आणि पप्पू शेख (२) यांच्याही बकऱ्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत.​विशेष म्हणजे, हे सर्व शेतकरी नसून गावातील सर्वसामान्य पशुपालक मजूर आहेत, जे मजुरी करून आणि जनावरे पाळून आपला संसार चालवतात. त्यांच्याकडील एकमेव आर्थिक आधार असलेली ही जनावरे चोऱ्याला गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रात्रीच्या वेळी गोठ्यांना लक्ष्य करणाऱ्या या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात पोलिसांची कडक गस्त वाढवावी, अशी आर्त हाक हवालदिल झालेला पशुपालक वर्ग देत आहे.