जालना : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आणि बालरंगभूमी परिषद, जालना जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जालना येथे संपन्न झाला. या महोत्सवात लोककलेशी निगडित समूहगीत गायन, एकलगीत गायन, समूह नृत्य, एकल नृत्य व एकल वाद्य वादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तब्बल २३० बालकलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध लोककलांचे बहारदार सादरीकरण केले.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जालना शहराच्या प्रथम महिला महापौर मा. वंदना अरुण मगरे, युवा उद्योजक व समाजसेवक तुळजेश चौधरी तसेच बालरंगभूमी परिषद, जालना जिल्हा शाखेच्या अध्यक्षा तथा अभिनेत्री वैशाली शालिग्राम दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई महाराष्ट्र अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या बालकलावंतांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
विविध स्पर्धांसाठी सचिन खंदारे, रवीकुमार धुताडमल आणि सुनील खाडे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमजद सय्यद यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी संदीप इंगोले, अशोक माधवले, विशाल दाभाडे, राणी परदेसी (ठाकूर), राजकुमार दांडगे, सतीश निरवळ, अनिल व्यवहारे आणि राजेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेतील पाचही गटांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले बालकलावंत व संघ आता लातूर येथे दोन ऑक्टोबर रोजी *महाअंतिम फेरीत जालना जिल्हा शाखेचे प्रतिनिधित्व करतील. ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या माध्यमातून बालकलावंतांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेशी जोडण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले. बालकलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सादरीकरणाला मिळालेला प्रतिसाद यामुळे महोत्सवाचे वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.
छायाचित्र सहकार्य- अनिल व्यवहारे, जालना
स्पर्धेचा निकाल
समूह नृत्य
सर्वोत्कृष्ट : नूतन विद्यालय, जालना
उत्कृष्ट : संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय
उत्तम :त्रिभुवन विद्यालय
प्रशंसनीय : नागोजीराव सतकर विद्यालय व सरस्वती भुवन विद्यालय
एकल नृत्य
सर्वोत्कृष्ट : मनस्वी दांडगे
उत्कृष्ट : अर्निका त्र्यंबके
उत्तम : श्रावणी घायाळ
प्रशंसनीय : अंतरा सोनवणे व स्वरमयी तिरपुडे
समूह गायन
सर्वोत्कृष्ट :सरस्वती भुवन विद्यालय
उत्कृष्ट : ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल
उत्तम : माऊंट लिटेरा झी स्कूल, अंबड
एकल वाद्य वादन
सर्वोत्कृष्ट : दत्ता पांचाळ
उत्कृष्ट : संबोधी इंगोले
उत्तम :ओंकार मगर
एकल गायन
सर्वोत्कृष्ट : संबोधी इंगोले
उत्कृष्ट : दूर्वा संन्याशी
उत्तम :संविधान इंगोले
प्रशंसनीय : माही कोठारे व कृष्णा शिंदे